नरेश मणेरा यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

ठाणे : ठाणे महापालिकेचे माजी उपमहापौर नरेश मणेरा यांनी शनिवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मणेरा यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवला. ठाणे महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत निवडून आलेल्या शिवसेना नगरसेवकांपेकी मणेरा हें दुसरे नगरसेवक आहेत ज्यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवला आहे.
एकनाथ शिंदे यांच्याबंडानंतर ठाण्यातील शिवसेनेत उभी फुट पडली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे असें दोन गट पडले आहेत. मागील महापालिकेतील शिवसेनेच्या 67 नगरसेवकांपेकी केवळ खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवला होता. पण शनिवारी घोडबंदर पट्ट्यातील माजी नगरसेवक नरेश मणेरा यांनी त्यांच्या समर्थकासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेतली. यावेळी शिवसेना नेते अरविंद सावंत खासदार विनायक राऊत राजन विचारे आदी उपस्थित होतें.नरेश मणेरा हें 1987 ला महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत निवडून आलें होतें. तसेच त्यांनी पहिल्यांदा उपमहापौर ही भूषवलं होतं. घोडबंदर पट्ट्यात मणेरा यांना मानणारा मोठा वर्ग आहे. याबाबत मणेरा यांच्याशी संपर्क साधला असता तें म्हणाले की माझा उद्धव ठाकरे यांनाच पाठिंबा आहे. आज त्याचं कारणाने मी त्यांची सदिच्छा भेट घेतली असं मणेरा यांनी सांगितलं.

 3,240 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.